सांगलीतील (Sangali Mass suicide) म्हैसाळ येथून काही दिवसांपूर्वी घरातील एकत्र 9 जणांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. तोपर्यंत ही सामूहिक आत्मत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हैसाळ येथील सामूहिक आत्महत्या नसून हे हत्याकांड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही भोंदू बाबा असल्याचं समोर आलं आहे. या दोघांनीच विषारी औषध देऊन हसत्या-खेळत्या कुटुंबाचा घास घेतला. या प्रकरणात गुप्त धन, तंत्र-मंत्र आदी पैलूही समोर आले आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)