![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/06/Crime--380x214.jpg)
Pune Crime News: पुण्यात क्षुल्लक गोष्टींमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालली आहे. पुणे शहरातून एका कौटुंबिक वादाची धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील पाषाण परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. घरात जेवणात चिकन न दिल्याने रागाच्या भरात बापाने मुलीच्या डोक्यात वीट मारली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती चतुश्रुगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला आहे. लहानग्या मुलीला डोक्याला गंभीर जखम झाल्याने तीच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरात वाकेश्वर भागात ही घटना घडली. जेवणात चिकन मिळालं नाही म्हणून रागाच्या भरात वडिलांनी पोटच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला. वीट उचलून थेट डोक्याला मारले. मुलगी रक्तबंबाळ झाली. तीच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर झाली. शेजारच्यां मदतीने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेअंतर्गत आरोपी वडिलांवर चतुश्रुंगी पोलिस ठाण्याच तक्रार नोंदवला गेला आहे. वडिलांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास नागनाथ राठोड असं आरोपीचे नाव आहे. (हेही वाचा-सख्ख्या भावांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार,आरोपींना अटक)
नेमकं काय घडल?
सोमवारी रात्री विकासने पत्नीकडे जेवण मागितले. पत्नीने जेवायला ताठ वाढून दिले. मात्र जेवणात चिकन नव्हते. त्याय गोष्टीचा विकासला भरपूर राग आला. संतापलेला विकास काहीच विचार न करता बाजूला असलेली वीट उचलली आणि लहानग्या मुलीच्या डोक्यात मारली. घटनेत मुलीचा डोकं फुटलं. ती फार गंभीर जखमी झाली. या प्रकरणी आरोपीच्या सासरे रघूनाथ लालू पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आणि मुलीला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.