Avinash Bhosale (Photo Credits-Twitter)

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर नुकतीच ED ने धाड टाकल्याचे दिसून आले. याच पार्श्वभुमीवर आज पुणे येथील प्रसिद्धा बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून विदेशी चलन प्रकरणात तब्बल 10 तास चौकशी केली आहे. भोसले यांची FEMA अंतर्गत चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर अविनाश भोसले हे सकाळी 10 वाजता ईडी कार्यालयात पोहचले होते. त्यानंतर ते रात्री 8 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. मात्र कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर अविनाश भोसले यांनी मीडियाशी बातचीत करणे टाळत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.(Sanjay Raut On BJP: जुनी थडगी उकरत ED हडप्पा, Mohenjo-daro काळापर्यंत पोहोचेल; संजय राऊत यांचा टोला)

ईडीकडून अविनाश भोसले यांच्याकडी काही कागद पत्रांबद्दल तपास चौकशीदरम्यान करण्यात आल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. याआधी ईडीकडून पुण्यात काल अनेक ठिकाणी अचानक छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र कालच्या छापेमारीच्या कारणास्तवच ईडीने अविनाश भोसले यांना बोलावले होते का असा सवाल आता उपस्थितीत केला जात आहे.(ED Eummons Pratap Sarnaik: अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी बोलावले)

दरम्यान, प्रताप सरनाईक यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी केली जात असून बुधवारी रात्री अमित चांदोले नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तर अमित शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात आले आहे. ईडीच्या सुत्रांनुसार अमित हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी पैसे जमा करायचा. तसेच ईडीने बुधवारी प्रताप सरनाईक यांचा मुला विहंग याला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र पत्नीची तब्येत बिघडल्याचे कारण देत त्यांनी एका आवड्याचा कालावधी मागितला. पण ईडीने त्यांना वेळ दिली नाही आणि चौकशीसाठी बोलावले.