Pratap Sarnaik | (Photo Credits: Facebook)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) ने शिवसेना आमदार प्रताप सरकानाईक ( Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आमदार सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांना ईडी (ED) ने कालच ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता प्रताप सरकानीईक यांनाही ईडीने बोलावले आहे. विहंग सरनाईक आणि त्यांचे पूत्र विहंग यांची ईडीद्वारे समोरासमोर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते.

ईडी (ED) पथक प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयात काल(24 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजणेच्या सुमारास चौकशीसाठी पोहोचले. ईडीचे दिल्ली येथील पथक सरनाईक यांच्या घरी प्रदीर्घ काळ चौकशी करत होते. दरम्यान विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. आता सरनाईक पितापूत्रांची चौकशी केली जाऊ शकते.

दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मी अर्नब गोस्वामी, कंगना रनौत आदी प्रकरणांध्ये आक्रमक भूमिका घेतल्यानेच माझ्या मागे इडीची चौकशी लावली जात आहे. परंतू, काही झाले तरी आपण बोलणं थांबवणार नाही. आपण ईडीला अथवा कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. आपल्याला फाशी जरी दिले तरी आपली तयारी आहे. आपण बोलत राहणारच असे सरनाईक यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sharad Pawar Slams Centre: केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे; प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया)

प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने शोधमोहीम हाती घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. महाविकासआघाडीमधील नेते आक्रमक झाले असून, शिवसेना नेते संजय राऊत, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ईडीने आमच्या आमदारांच्या दारात जरी कार्यालय थाटले तरी आम्ही घाबरत नाही. आमचे आमदार शरण जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर, जो बोलतो त्याच्याविरोधात केंद्र सरकार कारवाई करत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. त्यामुळेच ते ईडी, सीबीआय, एनसीबी आदी संस्थांच्या माध्यमातून कारवाई करत असल्याचे म्हटले आहे.