पुण्यामध्ये नवीन नोकरी मिळाल्याने बंगळूरुहून पुण्याला आलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला कात्रज ते येरवडा (Katraj To Yerwada) असा केवळ 18 किलोमीटर च्या प्रवासासाठी रिक्षाचालकाने 4300 रुपये आकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रवाशाने ही घटना बुधवारी पहाटे दरम्यान घडली. या शहरात नवीन असल्याने या तरुणाने रिक्षाचालकाने मागितलेले भाडे दिले. त्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनात या प्रकरणी तक्रार दाखल केली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचालकाने मद्यपान केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हा तरुण बुधवारी पहाटे बंगलोरहून पुण्यात आला. त्यानंतर खूप वेळ ऑनलाईन कॅब बुक होत नसल्या कारणाने त्याने कात्रजहून येरवड्याला जाण्यासाठी त्याच्या जवळून जाणारी एक रिक्षा थांबवली. त्यावेळी एक माणूस रिक्षा चालवत होता आणि मागच्या सीटवर एक माणूस बसला होता जो मूळ रिक्षाचालक होता. मात्र त्याने मद्यपान केले होते असे तरुणाच्या लक्षात आले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी त्याला त्याच्या निश्चित स्थळी पोहोचवल्यानंतर त्याच्याकडून 4300 रुपये भाडे आकारले. हेही वाचा- पुणे: दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस; पोलिस स्थानकात कपडे उतरवण्याची भाषा (Watch Video)
काही तरी चुकीचे होतय हे त्या तरुणाला जाणवतं होते. त्यामुळे त्याने याबाबत त्या दोघांना विचारणा केली असता या शहरात कोणी आले तर त्यांना 600 रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागते असे थातूर-मातूर कारण त्यांनी दिले. हे कारण त्याला पटले नाही. मात्र आपण या शहरात नवीन आहोत, त्यात तो रस्ता निर्मनुष्य असल्या कारणाने त्याने त्यांना 4300 रुपये दिले.
त्यानंतर एक दक्ष नागरिक म्हणून त्या तरुणाने ताबडतोब येरवडा पोलीस स्टेशनात जाऊन तक्रार नोंदवली. त्याच्या तक्रारीवरुन पोलीस या रिक्षाचालाकाचा आणि त्याच्या मित्राचा शोध घेत आहेत.