पुणे (Pune) जिल्ह्यात एका 45 वर्षीय मुलानेच आपल्या 86 वर्षांच्या वडिलांची हत्या केली आहे. वयाच्या 86 व्या वर्षी वडीलांना लग्न (Marriage) करण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एका मॅरेज ब्यूरमध्ये (Marriage Bureau) नाव नोंदवले होते. या नावनोंदणीवरुन वडीलांबद्दल या व्यक्तीच्या मनात राग होता. या रागाच्या भरात त्याने वडिलांची हत्यात केली. पुणे येथील राजगुरुनगर (Rajgurunagar) परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, मुलाने प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. वडीलांकडून प्रॉपर्टीमध्ये वाटेकरु घेतला जाईल या भीतीनेच मुलाने वडीलांचा काटा काडल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वडिलांनी या वयात जर दुसरे लग्न केले तर समाज काय म्हणेल. समाजात आपली बदनामी होईल. आपली प्रतिमा मलीन होईल या रागातून मुलाने हे कृत्य केले. टीव्ही नाईनने याबाबत वृत्त दिले आहे. खेड पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही घटना इतकी भायवह होती की, मुलाने वडिलांचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गळा चिरला जात नसल्यने अखेर त्याने दगडी वरवंट्याने वडीलांच्या तोंडावर प्रहार केले. वडिलांच्या डोक्यात वरवंटा घातला. घाव वर्मी लागल्याने वडिलांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, बारामती: माहेरहून सोने आणले नाही म्हणून सूनेची हत्या, सासरच्या घरासमोर घरातल्यांनी केले अंतिमसंस्कार)
धक्कादायक म्हणजे वडिलांचा खून केल्यानंतर खेड पोलीस ठाण्यात जाऊन मुलाने गुन्ह्याबाबत माहिती दिली. तसेच, वडिलांच्या हत्येची तक्रार देत तोच फिर्यादीही झाला. शेखर बोऱ्हाडे (वय 47 वर्ष, रा. राजगुरुनगर) असे आरोपीचे नाव आहे. तर शंकर रामभाऊ बोऱ्हाडे (वय 86 वर्ष) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे (वडील) नाव आहे. राजगुरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.