पुणे शहरातील 69 कंटेनमेंट झोन मध्ये 11 ते 17 मे पर्यंत पाळणार कडकडीत बंद- महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचा निर्णय
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे महानगरपालिका (PMC)  आयुक्त शेखर गायकवाड (Shaekhar Gaikwad) यांच्या माहितीनुसार पुण्यातील कंटमेंट झोनमधील (Pune Containment Zone)  सर्व दुकाने 11 ते 17 मे दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश दिले असून शहरातील सर्व कंटेनमेंट झोनमध्ये केवळ रुग्णालये व मेडिकल दुकानेच सुरु राहू शकतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे शहरात एकूण 69 कंटेनमेंट झोन आहेत. यापूर्वी हडपसर मध्ये उद्यापासून सलग पाच दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु लागु करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता पुण्यातील सर्व कंटेनमेंट झोन मध्ये हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड, ग्रीन आणो ऑरेंज झोन विभाजित केलेल्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या माहितीनुसार, पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 242 झाली आहे. यात 2 हजार 51 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर विभागात कोरोनाबाधीत एकुण 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 104 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण 22,516 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी तपासून पहा एका क्लिक वर

ANI ट्विट

दरम्यान, सद्य स्थितीत महाराष्ट्रात 20, 228 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. यात काल 1165 नव्या रुग्णांची भर पडली असून 48 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 779 वर पोहोचली आहे.