Pune: नोकरी न मिळत असल्याने 24 वर्षीय MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिली 'ही' बाब
Death (Photo Credits-Facebook)

Pune MPSC Student Suicide: पुण्यातील हडपसर येथे राहणाऱ्या स्वप्निल लोणकर याने आत्महत्या केली आहे. 24 वर्षीय स्वप्निलने एमपीएससीसाठी तयारी केली होती. एमपीएससी परीक्षा सुद्धा त्याने उत्तीर्ण केली पण त्याला सुरक्षित नोकरी मिळाली नाही. अशातच कोरोनाची सुद्धा परिस्थिती असल्याने नैराश्याने स्वप्निल याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट सुद्धा पाठी सोडली आहे.(Lonavala: वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला गेलेल्या दोघांचा खाणीत बुडून मृत्यू, लोणावळ्याच्या कुसगाव परिसरातील घटना)

हडपसर पोलिसांनी असे म्हटले की, स्वप्निल याच्या वडीलांची शिवनेरी पेट परिसरात एक प्रिंटिंग प्रेस आहे. बुधवारी दोन्ही पालक कामासाठी नेहमीप्रमाणे गेले. तसेच बहीण सुद्धा काही कामासाठी बाहेर गेली. मात्र जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला घरात भाऊ दिसला नाही. तिने भावाच्या खोलीत प्रवेश केला असता तिने त्याला आत्महत्या केल्याचे पाहिले. यानंतर तातडीने बहिणे पालकांना आणि पोलिसांनी कळवले. लोकणर याला रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

स्वप्निल याने आपल्या सुसाइट नोट मध्ये असे लिहिले आहे की, “एमपीएससी ही एक भ्रम आहे. त्यासाठी पडू नका. जसजसे माझे वय वाढत जात आहे, तसे ओझे वाढत आहे.माझा आत्मविश्वास क्षीण होत चालला आहे आणि आत्म-विकास वाढत आहे. उत्तीर्ण होऊन दोन वर्ष झाली. पर्वतासारखे कर्ज हे खासगी नोकरी करुन फिटण्यासारखे नाही.(Pune Unlock: कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी)

जर कोविड नसता तर परीक्षा वेळेवर झाली असती. आयुष्य वेगळे असते. खुप वेळा मनात नकारात्मक भावना यायच्या पण आशेचा किरण होता की, काहीतरी उत्तम होईल. पण असे काहीच आता झाले नाही. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. हा माझा स्वत:चा निर्णय आहे. मला माफ करा. असे त्याने हिंदीत म्हटले आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.