पुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (फोटो सौजन्य-फेसबुक)

भाजप (BJP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पुलवामा (Pulwama) हल्ल्याचा संदर्भ देत, पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले असल्याचे वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर दानवे यांच्या विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

सोलापूर येथे केलेल्या भाषणात बदल करुन चुकीच्या पद्धतीने तो लोकांपर्यंत पोहचवण्यात आलेला आहे. तर रावसाहेब दानवे यांचा सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल पक्षाकडून याबद्दल पत्रक काढले असून तो बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्धमाध्यमांनी संपूर्ण चौकशी करुन व्हायरल झालेल्या या व्हिडिओबद्दल नाचक्की केली जात असलेल्या कारस्थानाकडे लक्ष देऊ नये असे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे देशात संताप व्यक्त केला जात आहे.(हेही वाचा-खासदार रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त विधान; 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले')

सोमवारी राष्ट्रवादी पक्षाने दानवे यांचा पुलवामावरील व्हिडिओ ट्वीट करुन जवानांना त्यांनी अतिरेकी ठरविले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विरोधीपक्षाकडून सुद्धा दानवे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.