सहकारी असलेल्या महिला प्राध्यापकास व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अश्लील चित्रफीत (Pornographic Videos) असलेली लिंक पाठवणे एका रंगेल प्राध्यापकाला (Professor) चांगलेच महागात पडले. या गुन्ह्याबाबत कोर्टाने संबंधीत प्राध्यापकास तब्बल 5 वर्षांचा कारावास आणि आठ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. हे प्रकरण साधारण चार वर्षांपूर्वी घडले होते. पीडित महिला प्राध्यापकाने आरोपीविरुद्ध चार वर्षांपूर्वी तक्रार दाखल केली होती. बीड (Beed) जिल्ह्यातील एका महाविद्यालयाशी संबंधीत हे प्रकरण आहे.
प्राप्त माहितीनुसार, गजानन नरहरी करपे (वय 41 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा बीड येथील स्वराज नगर येथील राहणारा आहे. हा प्राध्यापक बीड येथीलच एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात नोकरी करत होता. त्याने सोबतच्या महिला प्राध्यापीकाच्या व्हॉट्सअॅपवर अश्लिल चित्रफीत असलेली लिंक पाठवली. धक्कादायक म्हणजे ज्या महिला प्राध्यापकाच्या व्हॉट्सअॅपवर या प्राध्यापक महोदयांनी अश्लील चित्रफीतीची लिंक पाठवली. ती महिला प्राध्यापीका महाविद्यालयातील विशाशा समितीच्या प्रमुख होत्या.
प्राध्यापकाने केलेले वर्तन महिला प्राध्यापीकेने महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तत्काळ कडक कारवाई करत महाविद्यालयाने संबंधित प्राध्यापकास सेवेतून निलंबीत केले. त्यानंतर महिला प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीवरुन हे प्रकरण न्यायालयात गेले. तब्बल चार वर्षे खटला चालला. त्यानंतर विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीएम खडसे यांनी या प्रकरणात या प्राध्याप्रकास पाच वर्षांचा कारावास आणि आठ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.