भारतीय रेल्वे, स्टेशन आणि रुट यांच्या खासगीकरणासाठी काम सुरु झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या एका बैठकीत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडून खासगी ऑपरेटर्ससाठी 150 नवे मागे आणि रेल्वे संबंधित पुढील प्लॅन तयार करण्यास सांगितले आहे. या मार्गावरुन दुरांतो, तेजस आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या प्रिमियम ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे या रेल्वे खासगी ऑपरेटर्सच्या हाताखाली जाणार आहेत.
मुंबई मिरर यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वेकडून या प्रस्तावासाठी 150 ट्रेनची बोली सुद्धा लावणार आहेत. रेल्वे बोर्डाटे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी असे म्हटले आहे की, पुढील महिन्यात 150 ट्रेनची बोली लावली जाणार आहे. पुढे त्यांनी असे ही म्हटले देशात हे पहिल्यांदाच होत आहे. तर बोली लावणारी कंपनी त्यांचे प्रथम क्वालिफिकेशन मागवणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात REP पाहिला जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गांवर 30 खासगी ट्रेन मुंबई येथून चालवली जाणार आहे. मुंबई मध्ये सेंट्रल, कुर्ला, वांद्रे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रेल्वे धावणार आहेत. या ट्रेन पश्चिम आणि सेंट्रल मार्गावरुन धावण्याची शक्यता आहे.(मुंबई- पुणे मार्गावर दोन तास ठप्प झालेली रेल्वे सेवा पुन्हा सुरु)