Mumbai-Pune Railway Block: मुंबई - पुणे रेल्वेसेवा अनेकदा ठप्प होते व मागील काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक सेवा अनेकदा विस्कळीत झाली आहे. आणि त्यात भर म्हणजे आज पुन्हा एकदा या मार्गावर मोठा बिघाड झाला असल्याने ही महत्त्वाची रेल सेवा काही काळापासून ठप्प झाली होती.
कर्जत पुढील ठाकूरवाडी ते मंकीहिल या दोन स्थानकांदरम्यान इलेक्ट्रिक वायरमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दोन तासापासून रेल्वे सेवा ठप्प झाली होती. परंतु आता ही सेवा पुन्हा सुरु झाली आहे
पुणे आणि मुंबई रेल्वे मार्गावर या वर्षी झालेल्या जोरदार पाऊसामुळे प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे खंडाळा जवळील घाटात काही दिवसांपासून दुरुस्तीचं काम सुरू होतं. आणि म्हणूनच गेल्या महिन्यात अनेक दिवस मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या काही सेवा रद्द करण्यात आल्या होत्या.
ठाणेकरांसाठी खुशखबर! ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्टेशनला मंजुरी; सरकार 14 एकर जागा देणार
पुणे आणि मुंबई जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर दैनंदिन अनेक गाड्या धावतात. कारण मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे असून नोकरदार वर्गातील अनेक लोक या शहरांदरम्यान रोजचा प्रवास करत असतात. परंतु आज झालेल्या या ऐन संध्याकाळ ब्लॉकमुळे या प्रवाशांचे हाल झाले आहे. कित्येक चाकरमानी खोळंबले असून पुन्हा ही सेवा कधी दुरुस्त होईल याची वाट बघत आहेत.