Navi Mumbai Suicide: रुग्णालयाचे अव्वाचे सव्वा बिल आकारल्यामुळे एका वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रशासनावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि एॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवजात जुळ्या मुलांचे रुग्णालयात उपचार सुरु होते अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नवी मुंबई हादरली आहे. (हेही वाचा- कोयत्या गॅंगची दहशत, पैश्यांच्या वादातून दुकानदारावर हल्ला, पुण्यातील संजय पार्क येथील घटना (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील शिरवणे येथील रहिवासी नरेंद्र प्रल्हाद गाडे याने शनिवारी पहाटे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने घरात चिठ्ठी लिहली होती. ही चिठ्ठी पोलिसांना सापडली आणि त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या प्रशासनावर गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर गाडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
जुळ्या मुलांवर उपचार
नरेंद्र आणि त्यांची पत्नी वंदना यांना या आधी मुलं नव्हेत. १३ वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हल्ला. वंदनाने जुळ्या मुलांना जन्म दिला परंतु जन्मानंतर दोघांची प्रकृती नाजूक होती अशी माहिती डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरच्या सांगण्याहून दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु झाले. त्यानंतर रुग्णालयातून ९० हजार रुपयांची बिल समोर आले. बिल भरण्यासाठी रुग्णालयातील प्रशासनाने नरेंद्र यांना तगादा लावला.
सुसाईट नोटमध्ये लिहलं होत..
त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्या चिठ्ठीत असे होते की, आत्महत्येचे कारण म्हणजे रुग्णालयातील बिलींग आणि प्रशासनाने अव्वाच्या सव्वा बिल आकारले होते. एक सामान्य व्यक्ती एवढे पैसे कुठून आणणार. रुग्णालयातील कर्मचारी सतत पैश्यांसाठी फोन करून त्रास द्यायचे. बिलींग डिपार्टमेंटमधून सतत मानसिक त्रास दिला. एवढंच नाही तर सुरु असलेले उपचार ते देखील थांबवले जाईल अशी धमकी देत राहिले. त्यामुळे टोकाचे पाऊस उचलावे लागले.