Pune Crime: कोयत्या गॅंगची दहशत, पैश्यांच्या वादातून दुकानदारावर हल्ला, पुण्यातील संजय पार्क येथील घटना (Watch Video)
पुणे नेमकं चाललं तरी काय? कधी कोयत्या गॅंगची दहशत तर कधी अपघाताची मालिका तर चोरी अश्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर अवघ्या ५० रुपयांसाठी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Crime: पुणे नेमकं चाललं तरी काय? कधी कोयत्या गॅंगची दहशत तर कधी अपघाताची मालिका तर चोरी अश्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर अवघ्या 50 रुपयांसाठी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली त्यामुळे घटना समोर आली आहे. पुण्यातील विमानतळाजवळील संजय पार्क येथे ही घटना घडली. व्हिडिओ दिसल्याप्रमाणे, तीन आरोपींनी दुकानाची तोडफोड करत आहे. (हेही वाचा- 9 वर्षांत 20 लग्नं, महिलांकडून लाखोंचा ऐवज घेऊन फरार झालेला इसम पालघर पोलिसांच्या जाळ्यात)
मिळालेल्या माहितीनुसार, संजय पार्क जवळील एका दुकानाची तोडफोड केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, काही बदमाश्यांनी दुकानाची तोडफोड करत दुकान मालकाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांना गुन्ह्याची माहिती देण्यात आली. किराणा दुकानात बिल न भरल्यामुळे हा वाद सुरु झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी रात्रीच्या वेळीस कोयता, लोखंडी रॉड घेऊन दुकानावर हल्ला केला. दुकानदाराला मारहाण करत धमकावले. या घटनेत दुकानाचे भरपूर नुकसान केले. दुकानदाराने पलटवार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
पाहा व्हिडिओ
PUNE | Who will take the credit for decent Pune, safe Pune, crime free Pune? An atmosphere of fear among the citizens in Pune, again in Pune this is how the Koyta Gang showed culture. pic.twitter.com/NwCHjuMZe9
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) July 28, 2024
इंदिरानगर बन्सीला लोहगाव रोडवरील सत्य शासकीय महाविद्यालयाजवळ असलेल्या जगदंबा प्रोव्हिजन किराणा दुकानात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर 25 जुलै रोजी गुन्हा दाखल केला. अनिल ओवावे (19), गौरव साठे (21), साहिल शेख (19) अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. पुणे पोलिस घटनेचा तपास सुरु करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2024 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

