Representational picture. Credits: Pixabay

Palghar Marriage Fraud: देशभरात तब्बल 20 महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज नियाज शेख असं आरोपीचं नाव असून तो प्रामुख्याने विधवा महिला त्याच्या टार्गेटवर असायच्या. वधू-वर सूचक संकेतस्थळांवरून त्यांच्याशी मैत्री करायचा, त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून महिलांशी मैत्री करायचा, त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा मग लग्न करायचा यात तो त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. प्रकरण उघडकीस येताच मोठ्या शोधमोहिमेनंतर पालघर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या त्याला २३ जुलै रोजी अटक केली. (हेही वाचा: Thane Shocker: ठाणे महानगरपालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; पिण्याच्या पाण्यात आढळले मृत प्राण्यांचे अवयव)

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील एका महिलेने फिरोज शेखविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ६.५ लाख रुपये व अनेक मौल्यवान वस्तू घेऊन तो फरार झाल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले.एका मेट्रिमोनियल साइटद्वारे तिची आणि फिरोजची ओळख झाली होती. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले.या तक्रीवरून पालघर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. (हेही वाचा:Maharashtra Honour Killing: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना; आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून तरूणाचा खून )

तो २०१५ पासून असे प्रकार करत होता. तपासादरम्यान फिरोजने महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी नाव व ओळख वापरून लग्नं केल्याचं उघड झालं. त्याच्याकडील लॅपटॉप, मोबाईल फोन, डेबिट व क्रेडिट कार्ड, चेकबूक, दागिन्यांसह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच त्याने अनेक महिलांची फसवणूक करून मिळवलेला ऐवजही जप्त केला आहे.