Thane Shocker: ठाणे महानगरपालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; पिण्याच्या पाण्यात आढळले मृत प्राण्यांचे अवयव
ठाण्यात रहिवाशांना पिण्याच्या पाण्यात मृत प्राण्यांचे अवयव आढळल्याचे समोर आले. रहिवाशांनी त्याचे फोटो एक्सवर टाकत महानगरपालिकेला टॅग करत त्याबाबतची तक्रार केली आहे. गांधी नगर, कापूरबावडी, मानपाडा भागामध्ये पाण्यात मृत प्राण्यांचे अवयव आढळल्याचे समोर आले आहे.
Dead Animals Part Found in Drinking Water: ठाणे महानगपालिकेचा सावळागोंधळ समोर आला आहे. नागरिकांना चक्क पिण्याच्या पाण्यात मृत प्राण्यांचे अवयव आढळले आहेत. एका रहिवाशाने X वर त्याबाबतची पोस्ट करत, 'लोकांना त्यांना पुरवलेल्या पिण्याच्या पाण्यातून मृत प्राण्यांचे काही भाग बाहेर येत असल्याचे आढळले. गांधी नगर, पोखरण 2, कापूरबावडी आणि मानपाडा भागात या घटना घडल्या आहेत.' असे म्हटले. त्याशिवाय, या प्रकरात दोषी असलेल्या नागरी संस्थांवर कारवाईची मागणी केली आहे. पोस्टमध्ये रहिवाशाने त्यासंदर्भातील फोटो शेअर केले आहेत. (हेही वाचा:Gujarat Farmer Finds Lion Family in Courtyard: मुसळधार पावसामुळे हैराण सिंहाचा शेतकऱ्याच्या गोठ्यात आश्रय(Watch Video) )
पोस्ट पहा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2024 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

