Gujarat Farmer Finds Lion Family in Courtyard: गुजरातमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमध्ये पुढील ४ ते ५ दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोसळणाऱ्या पावासाचा फटका वन्य प्राण्यांनाही बसत आहे. त्यामुळे वन्य प्राणी आश्रयासाठी मानवी वस्तीकडे वळत आहेत. त्यालाच अनुसरून एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. गुजरातमधील एका शेतकऱ्याला त्याच्या अंगणातील गोठ्यात सिंहांचे कुटुंब आश्रय घेत असल्याचे आढळले. ज्यात सिंहाचा छावा नर-मादा सिंह असल्याचे दिसत आहेत. सगळे पावसाचा आनंद घेत आराम करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. (हेही वाचा:Isolated Amazon Tribe Mashko Piro: पहिल्यांदाच जगासमोर आली ॲमेझॉनमध्ये राहणारी आदिवासी जमात माश्को पिरो; जाणून घ्या संपर्कात न राहणारे लोक अचानक बाहेर का आले (Watch Video) )

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)