Pre-Monsoon Weather Forecast for Maharashtra: नैर्ऋत्य मान्सून वारे म्हणजेच सर्व परिचित शब्दात सांगायचे तर मान्सून (Monsoon) भारतात दाखल झाला. केरळमार्गे भारतात दाखल झालेला मान्सून पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यामध्ये वातावरण ढगाळ झाले असून तापमानही काही प्रमाणावर घटले आहे. अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसांच्या सरी बरसल्याने मान्सूनपूर्व पाऊस बरसताना दिसतो आहे. या सर्व वातावरणात हवामान विभागाने (IMD Weather Forecast) राज्यभरात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. जाणून घ्या राज्यभरातील हवामान अंदाज.
महाराष्ट्रातील हवामान पूर्व मोसमी पावसासाठी पोषक
आयएमडीने हवामानाचा अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, महाराष्ट्रातील हवामान पूर्व मोसमी पावसासाठी (मान्सून) पोषक आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमाण घटत असून आकाशही ढगाळ असल्याचे पाहायला लागले आहे. संबंध राज्यभरात अशी स्थिती आहे. अपवाद फक्त विदर्भाचा. संपूर्ण महाराष्ट्रातील कमाल तापमान विदर्भ वगळता 40 अंशांच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळते. मंगळवारी (4 जून) सकाळपर्यंत पाठिमागील चोवीस तासांतील तापमानाची नोंद सर्वाधिक उच्चांकी म्हणून 43 अंश इतकी झाली. राज्यातील वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणही वाढत आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यने अधिक वेग धारण केला आहे. ज्यामुळे मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्मितीमध्ये महत्तवाचा वाटा राहतो. (हेही वाचा, Pune Rain News: पुणे येथे दमदार पाऊस, अनेकांच्या घरात पाणी; वडगाव शेरी परिसरात काही तासांत 114.5 मिमी पर्जन्यवृष्टी (Watch Video))
हवामाचा अंदाज
आयएमडीने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच 5 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या विभागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या विभागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये मात्र वातावरण ढगाळ असले तरी उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Weather Forecast for Monsoon: उष्णतेच्या लाटेवर मान्सूनचे पाणी, तापमान घटणार, जाणून घ्या हवामान अंदाज)
यो अलर्ट (वादळी पावसाचा इशारा) असलेले विभाग आणि जिल्हे
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.
कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
दरम्यान, मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ केली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, सकल भागांतील घरांमध्येही पाणी शिरले. काही भागांमध्ये वीजप्रवाह खंडित झाला. मुंबई शहरामध्येही अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी साधारण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तसेच, पावसामुळे उष्णतेपासूनही काहीसा दिलासा मिळाला.