पुणे शहर आणि परिसरात अचानक मुसळधार पाऊस (Heavy Rain in Pune) कोसळला. ज्यामुळे पुण्यातील पोरवाल रोड, धानोरी, विमान नगर, कल्याणी नगर आणि वडगावशेरी, वडाची वाडी, उंड्री यांसह अनेक भागांमध्ये वीज खंडित (Power Outage in Pune) झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) नोंदवले की, वडगावशेरीला सर्वाधिक फटका बसला असून, अवघ्या काही तासांत 114.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे विविध सखल भागात पाणी साचले असून त्यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणात होत असलेल्या नाट्यमय बदलांमुळे सामान्य नागरिकांस हवामान अंदाज बांधणे कठीण जात आहे.
अनेक ठिकाणी वीजप्रवाह खंडीत
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडचे (एमएसईडीसीएल) जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. "आमची टीम वीज पुनर्संचयित करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. अनेक भागात आधीच वीज परत आली आहे, परंतु मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे, विशेषत: पोरवाल रोड आणि धानोरीमध्ये स्थिती पूर्ववत करण्याच्या कामाला विलंब होत आहे. सर्व बाधित भागात वीज मध्यरात्रीपूर्वी पूर्ववत करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे राऊत यांनी सांगितले. (हेही वाचा, Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची हजेरी! उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, जीटीबी नगर स्थानकातील दृश्य (Watch Video))
पायाभूत सुविधांवर काही काळ परिणाम
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विमान नगरमधील काही रहिवाशांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली. विमान नगरमध्ये पावसाच्या तुरळक पावसानंतर वीज नाही. आता दोन तासांहून अधिक काळ लोटला आहे. आमच्याकडे पाऊस पडत असल्याने पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. प्रशासनही तक्रारींना दाद देत नाही. तुमचे फोन नंबर काम करत नाहीत, वीज कधी येईल? असे सवाल या नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे उपस्थित केले. (हेही वाचा, )
व्हिडिओ
#Pune: Dhanori Road flooded after heavy rainfall today.#Pune #punerain #waterlogging #punenews @PMCPune @LRWAPune pic.twitter.com/xOgZNGe7oN
— Punekar News (@punekarnews) June 4, 2024
दरम्यान, पुण्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी सोमवारी शहरातील काही भागात पावसाने हजेरी लावली. अनपेक्षितपणे कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुणे शहराजवळील वडाचीवाडी उपनगर 3 जून 2024 रोजी तासाभराच्या पावसाने पाण्यात बुडाले होते. या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. वडाचीवाडी परिसरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाळ्यात यंदाही हा रस्ता रखडण्याची शक्यता आहे. वडाचीवाडी गावात एक फुटापर्यंत पाणी साचले. वाहने संथ गतीने चालवताना दिसत होती. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होत आहे. यंदाचा मान्सून चांगला बरसणार असल्याचे संकेत आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.