पुणे शहरातील (Pune City) युवकाची अमेरिकेत मोठ्या जहाज कंपनीवर (Ship Management) निवड झाली होती. अमेरिकेत जहाजावर डेस्क कॅडेट म्हणून तो रुजूही झाला होता. परंतु अमेरिकेतून तो 5 एप्रिलपासून बेपत्ता झाला आहे. कंपनीने तुमचा मुलगा बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे कळवले होते. त्यानंतर मात्र काहीच माहिती कंपनीकडून दिली जात नसल्याने मुलाचे पालक धास्तावले आहेत.   विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कला काम करायचा. (हेही वाचा - Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड भागात गुंडाकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, शर्ट काढून....; पोलिसांनी दिला चोप)

युवकाच्या पालकांनी पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रणव गोपाळ कराड असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तक्रारीत म्हटले आहे की, प्रणव हा पुण्यातील एमआयटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याची निवड विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट या अमेरिकेतील कंपनीत झाली होती. तो अमेरिकेत ज्वाईन होण्यासाठी गेला होता. जहाजावर डेस्क कॅडेट म्हणून तो काम करु लागला. परंतु 5 एप्रिल रोजी कंपनीकडून तो हरवल्याचा फोन आला. त्यानंतर या संदर्भात 6 एप्रिल रोजी मेल आला. परंतु त्यानंतर कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नाही.

विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट कंपनीकडून प्रणव याच्या सहकारी आणि मित्रांचे मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालय, जहाजबांधनी मंत्रालयाशी संपर्क करुन मुलाचा शोध घ्यावा, अशी मागणी गोपाळ कराड यांनी केली आहे. या घटनेमुळे प्रणव यांचे कुटुंबीय हादरले आहे. मुलाच्या शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.