Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

धनुष्यबाण (Bow-and-Arrow) कोणाचे आणि खरी शिवसेना (Shiv Sena) कोणाची? याबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) परवानगी दिली आहे. एकनाथ शिंदे गट (Minister Eknath Camp) विरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना असा वाद पाठिमागील काही दिवसांपासून सुरु आहे. याच वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या वेळी निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाचा निर्णय हा उद्धव ठाकरे गटासाठी धक्का मनाला जातो आहे.

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यांबाबत एकनाथ शंदे गटाने केलेल्या दाव्यावर निर्णय घेण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटने केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर (Constitution Benc) सुनावणी आज सुरू होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच न्यायाधिशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आजचा दिवस विशेष ऐतिहासीक ठरला कारण घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.