गडचिरोली: नक्षलवादी हल्ल्यात एक जवान शहीद
Naxal attack | ant Singh Suicide Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नक्षलवादी हल्ल्यात (Naxal Attack) एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दुशंत नंदेश्वर असं शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. तर दिनेश भोसले नावाचा जवान या हल्ल्यात जखमी झाला आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील कोठी या गावात नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या आधीही काही दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या वेळीही या घटनेत दोन जवान शहीद झाले होते.

प्राप्त माहितीनुसार, हल्ला झालेले दोन्ही जवान साध्या वेशात होते. ते कोठी या गावात खरेदीसाठी गेले होते. या वळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दुशंत नंदेश्वर शहीद झाले. तर दिनेश भोसले जखमी झाले. दिनशे भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Maharashtra Monsoon Update Today: मुंंबईत आज पावसाला आराम; भंडारा, गडचिरोली गोंंदिया मध्ये पुढील 3 तास मध्यम ते मुसळधार पावसाचे अंदाज- IMD)

नुकताच शहीद सप्ताह पार पडला. या सप्ताहामध्ये या परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची अनुचीत घटना या परिसरात घडवता आली नाही. त्यानंतर अल्पवाधतीच पोलिसांनी दोन अत्यंत जहाल नक्षलवाद्यांनाही अटक केली होती. इतर दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे नक्षलवाधी बिथरले आणि त्यांनी हल्ला केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तीन महिन्यांपूर्वीही हल्ला केला होता. त्या वेळी दोन जवान शहीद झाले होते. पोयरकोटी-कोपर्शी येथील जंगलात काही नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. या वेळी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. या वेळी लपलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. यात दोन जवान शहित झाले होते.