हवामान खात्याचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांंच्या माहितीनुसार आज 9 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच नागपुर (Nagpur), चंद्रपुर (Chandrapur), भंडारा (Bhandara), वर्धा (Wardha), गडचिरोली (Gadchiroli), गोंंदिया (Gondia) येथे पुढील तीन तास मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी बरसतील. यावेळी अनेक ठिकाणी विजांंच्या कडकडाटासह पाउस होईल. या भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंंबई आणि कोकण प्रांतात पावसाने आज थोडी विश्रांंती घेतली आहे. मुंंबई (Mumbai Rains) व उपनगरात बर्याच दिवसांनी उन पडल्याचे दिसतेय, मात्र दिवसातुन अधुन मधुन सरी बरसतील असा अंदाज आहे. कोकणात सुद्धा हलक्या स्वरुपाचा पाऊस आज होऊ शकतो.
मुंंबईच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी किनारपट्टी लगत पुन्हा एकदा मान्सुन सक्रिय होणार आहे. त्यामुळे 10 व 11 ऑगस्ट दरम्यान शहरात पुन्हा एकदा तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे.
के.एस.होसाळीकर ट्विट
Nowcast warning 9 Aug 09:15 hrs.for nxt 3 hrs.Thunderstorm,lightning & light to mod RF very likely to occur at most places ovr Bhandara, many places ovr Chandrapur,Gadchiroli, Gondia & few places ovr Nagpur, Wardha. Possibility of hvy RF ovr Bhandara,Gadchiroli,Gondia isol places pic.twitter.com/yn8BY5ffGk
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 9, 2020
दरम्यान, मागील आठवड्यात मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपुन काढले होते. आठवड्याच्या सुरुवातीलाच मागील कित्येक वर्षातील विक्रमी पावसाची नोंंद झाली होती, या पावसात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार सुद्धा घडले होते. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे,रस्त्यावर पाणी साचण्याचे अनेक व्हिडिओ आपणही पाहिले असतील. आता अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवु नये यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत हे पाहणे महत्वाचे आहे.