प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या फास्ट फुडसाठी लावण्यात येणारे बटर (Butter) हे नेहमीच उत्तम प्रकराचे असावे असे मानले जाते. तसेच काही खाद्य विक्रेत्यांकडे बटर बनविणाऱ्या कंपनीचे नावसुद्धा लिहिलेले नसते. अशाच प्रकारची घटना मिरारोड (Miraroad) येथे घडली आहे.

घोडबंदर रोड परिसरातील एका कंपनीत बनावट बटर बनविणारी कंपनी कार्यरत होती. या प्रकरणी पोलिसांना माहिती कळताच त्यांनी कंपनीवर धडक छापे घालण्यास सुरुवात केली. यावेळी कंपनीतून हजारो किलोचे बनावट बटर सोबत अमूल बटर (Amul Butter)ची पाकिट जप्त करण्यात आली आहेत. तसेच काम करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (हेही वाचा-Hangover दूर करण्याचे '5' सोपे घरगुती उपाय !)

या कंपनीत बनविले जाणारे बटर हे नित्कृष्ट दर्जाचे असून ते अमूल बटरच्या पाकिटात भरुन बाजारात पुरविले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर रस्त्यालगत लागणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गाड्या यासाठी हे बटर वापरण्यात येत असल्याची शक्यता पोलिसांनी सांगितली आहे.