Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Police Employee Commits Suicide: पुण्यात (Pune) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. नाना हंडाळ, (Nana Handal) असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हंडाळ यांच्या आत्महत्येनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाना हंडाळ हे पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात काम करत होते.

प्राप्त माहितीनुसार, नाना हंडाळ हे शहरातील शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये डी इमारतीत राहत होते. ते पुण्यात शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. हंडाळ यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (वाचा - Nanded Bus Conductor Suicide: कंडक्टरने बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येचं गळफास घेऊन केली आत्महत्या; नांदेड आगारातील धक्कादायक घटना)

सध्या राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण वाढत आहे. अशातचं अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यात पुण्यात टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं होतं.

याशिवाय काही दिवसांपूर्वी पुण्यात सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाणने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पूजाच्या आत्महत्येनंतर भाजपने शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. शुक्रवारी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे लष्कर कोर्टात पहिला खटला दाखल करण्यात आला आहे.