कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी (Lockdown) घोषीत केली. महत्वाचे म्हणजे, संचारबंदीत नागरिकांना केवळ अत्यावश्यक सेवेसाठी (Essential Services) घराबाहेर पडण्याची अनुमती दिली जाते. मात्र, काही जण संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. मुबईमधील कुर्ला- चेंबूर महामार्गावर (Kurla-Chembur Highway) स्थानिक पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. या दरम्यान, वाहनांची वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे ओळखपत्र आणि त्यांचे पास तपासले जात आहेत.
कोरोना विषाणुने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणुमुळे आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 लाखांच्या जवळपास लोकांना याची लागण झाल्याची समजत आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणुने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या यादीत भारताचाही समावेश आहे. भारतावर आलेले संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार महत्वाची भुमिका बजावत आहेत. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भारताने संपूर्ण देशात संचारबंदीचा मार्ग निवडला आहे. मात्र, काही नागरिक पंतप्रधानाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे समजत आहे. कोरोना विषाणु भारतातवर आलेले मोठे संकट असून कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र, तरीही काही लोक घराबाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. अशाच पोलिसांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जात आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. हे देखील वाचा- मुंबई: Lockdown च्या काळात सरकारचे नियम धाब्यावर बसविणा-या Kooler Cafe च्या मालकाला पोलिसांचा दणका, Watch Viral Video
एएनआयचे ट्वीट-
Mumbai: Police check passes and identity cards of people amid the movement of vehicles during #CoronavirusLockdown, movement of only those availing or providing essential services is being allowed. Visuals from Kurla-Chembur highway. pic.twitter.com/zKrZHXFyZr
— ANI (@ANI) March 30, 2020
महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 195 पोहचली आहे. त्यापैंकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली होती.