POCSO Court Verdict: मुलीचा हात पकडून प्रपोज करणे लैंगिक अत्याचार नाही, मुंबई पोस्को कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

अल्पवयीन मुलींवर (Minor Girl) होणाऱ्या अत्याचाराला रोख लावण्यासाठी न्यायालयाने अनेक अरोपींना कठोर शिक्षा सुनावली आहे. यामुळे अल्पवयीन मुलीची छेड काढणे एखाद्याला महागात पडू शकते. याचपाश्वभूमीवर मुंबई पोक्सो कोर्टाने (Mumbai POSCO Court) लैंगिक अत्याचारप्रकरणी (Sexual Abuse)  महत्वपूर्ण निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला प्रपोज करणे लैंगिक अत्याचार मानले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. यामुळे याप्रकरणातील आरोपीची सुटका करण्यात आली आहे. तसेच आरोपीने फिर्यादी मुलीचा हात पकडला होता. त्यावेळी त्याच्या मनात लैंगिक अत्याचार करण्याचा विचार असल्याचा पुरावा फिर्यादी पक्ष सादर करू शकले नाहीत, असेही कोर्टाने म्हटले आहे.

एका 28 वर्षीय आरोपीने 2017 मध्ये एका 17 वर्षीय मुलीचा हात पकडून तिला प्रपोज केला होता. त्यानंतर मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणात सुनावणी करताना कोर्टाने म्हटले आहे की, आरोपीच्या मनात फिर्यादी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा हेतू असल्याचे कोणताही पुरावा नाही. तसेच आरोपी पीडितेचा वारंवार पाठलाग करत होता किंवा तिला एखाद्या निर्जन ठिकाणी अडवले किंवा मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी बळाचा वापर केल्याचा कोणताही पुरावे नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हे देखील वाचा- Thane: हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग; 4 जण अटकेत

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणात निर्णय देताना न्यायमूर्तींनी म्हटले आहे की, आरोपीने फिर्यादी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा कोणतेही पुरावे फिर्यादी पक्षाने सादर करू शकलेला नाही. यामुळे संबंधित तरुणाला बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून सोडून देण्यात यावे, असा आदेश कोर्टाने दिला आहे.