PMC BANK Depositors (Photo Credits: Twitter/ ANI)

पंजाब महाराष्ट्र को ऑप बॅक (पीएमसी) खातेदारांचा आजही आंदोलन कायम आहे. एचडीआयएलचे (HDIL) प्रमोटर राकेश वधवान आणि त्यांच्या मुलगा सारंग वाधवान यांच्या अटकेनंतर त्यांना जामीन नाकारण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली आहे. पीएमसी बॅंकेतील गैरव्यवहाराप्रकरणी दोघांना 3 ऑक्टोबर दिवशी अटक करण्यात आली होती. पीएमसी बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी वरयाम सिंह यांनादेखील अटक करण्यात आली असून त्यांच्यावरील आरोपांची ईडी कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. Shivajirao Bhosale Co-operative Bank: पीएमसी प्रकरणानंतर महाराष्ट्रात अजून एका बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; हजारो ग्राहक काढू शकणार नाही पैसे

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे आहेत.

ANI Tweet 

आरबीयाने पीएमसी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घातल्याने खातेदारांना पैसे काढण्यावर मर्यादा आली आहे. तसेच कर्ज आणि बॅंकेच्या इतर सोयींपासून त्यांना लांब ठेवण्यात आले आहे.