Vande Bharat Express, Pm Modi (PC - Twitter,facebook)

महाराष्ट्राच्या ताफ्यात मुंबई-सोलापूर (Mumbai-Solapur)आणि मुंबई-साईनगर शिर्डी (Mumbai Sainagar Shirdi) या दोन नव्या वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat) भर पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यासाठी उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारीला मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. पंतप्रधान या दोन्ही वंदे भारत ट्रेन्सला हिरवा कंदील दाखवणार आहेत. मुंबई मध्ये सीएसएमटी स्थानकातून या दोन्ही ट्रेन्सना पंतप्रधान दुपारी 3 च्या सुमारास हिरवा कंदील दाखवणार आहेत. या ट्रेन्सची निर्मिती चैन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री मध्ये करण्यात आली आहे.

मुंबई आणि सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस भोर घाटातून प्रवास करण्याची शक्यता आहे. ही ट्रेन मुंबई ते सोलापूर हे 455 किमी चं अंतर साडे सहा तासांमध्ये पूर्ण करणार आहे. तर मुंबई साईनगर शिर्डी ही हाय स्पीड ट्रेन थाल घाटातून जाणार आहे. 340 किमीचा रस्ता 5 तास 25 मिनिटांत पूर्ण केला जाणार आहे.

मुंबईमधून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना भेटी

मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील 9वी वंदे भारत ट्रेन आहे. या ट्रेनमुळे मुंबई-सोलापूर मधील प्रवासाचं अंतर कमी होणार आहे. सोलापूरातील सिद्धेश्वर, अक्कलकोट,तुळजापूर, सोलापूर आणि पंढरपूर तसेच पुण्याजवळील आळंदीला पोहचणं जलद होणार आहे. तर मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन देशातील दहावी वंदे भारत ट्रेन आहे. यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनिशिंगणापूरला पोहचणं वेगवान होणार आहे.

वंदे भारत तिकीट दर

मुंबई ते शिर्डी चेअर कार 800 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1630 रुपये मोजवे लागणार आहेत. तर मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1970 रुपये मोजावे लागणार आहेत.

वंदे भारत वेळापत्रक

आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती करण्यात आली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.