Pune Viral Video PC TW

Pune Viral Video: पुणे हे शहर नेहमीचं कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहते. गेल्या महिन्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण हे अद्याप शांत झालेले नाही. प्रवाशी वाहतुकीच्या नियमांना दुर्लक्ष करतात हे एक कायमची समस्या झाली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि वाहतुक सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरु असते. यात सोशल मीडियावर निष्काळजीपणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा-देव तारी त्याला कोण मारी! अनियंत्रित अग्निशमन दलाचा टॅंकर पलटला, थोडक्यात दुचाकीस्वाराचा जीव वाचला (Watch Video)

लहान मुलांनी भरलेली स्कूल व्हॅन चालकाने ट्रॅफिकचे सिग्नल तोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. एका एक्स वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. त्यात असे लिहले आहे की, पुण्यात सर्व मर्यादा ओलांडल्या आहे म्हणून या गोष्टीचा आश्चर्य वाटत नाही. मुलांनी भरलेली स्कूल व्हॅन नियमांचे उल्लंघन करताना पाहून मला वेदना होत आहे. मुलांना धोक्याच्या वळणावर आणले. एकीकडे त्यांना नियमांचे पालन करण्यास शिकवतो आणि दुसरीकडे हे नियम तोडायचे शिकवतो. हा या चित्रातून दिसते.

दुसऱ्याने कंमेटमध्ये लिहले आहे की, त्यांना शहरातील वाहतूक पोलिसांचा धाक उरलाच नाही त्यामुळे नियमांचे उल्लघंन केले. आणखी एका वापरकर्त्याने लिहले आहे की, आमच्या रस्त्यांवरील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे नाहीशी झाली आहे. राजकारणी सत्ता आणि पैशासाठी पक्ष बदलण्यात व्यस्त आहेत.