Gujarat Accident: देव तारी त्याला कोण मारी! अनियंत्रित अग्निशमन दलाचा टॅंकर पलटला, थोडक्यात दुचाकीस्वाराचा जीव वाचला (Watch Video)
गुजरात राज्यातील वडोदरा येथील भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या अपघातातून दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
Gujarat Accident: गुजरात (Gujarat) राज्यातील वडोदरा येथील भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या अपघातातून ( Accident) दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचला आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली. वेगवान अग्निशमन दलाचा ट्रक अनियंत्रित होवून पटली झाला आणि या घटनेतून सुदैवाने दुचाकीस्वाराचा जीव वाचला. (हेही वाचा- बेपर्वा! टर्न घेताना भरधाव कारची धडक, दुचाकीचा अपघात (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात वडोदरा येथील दाभोई रोडवर शुक्रवारी 19 जुलै रोजी घडला. अग्निशमन दलाच्या टॅंकर रस्त्यावरू जात होता अचानक टॅंकर अनियंत्रित झाले आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पलटला. हा अपघात भीषण होता. डभोई रोडवरील गणेशनगर जवळ चालकाने वळण घेतल्याने हा अपघात घडला. दुसऱ्या रस्त्यावरून दुचाकी जात होती. टॅंकर दुचाकीवर पडलाच असता परंतु सुदैवाने दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.
Fire brigade turns turtle on a busy street in Gujarat's Vadodara. #Gujarat pic.twitter.com/1gbzv1BrvP
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) July 20, 2024
कृष्णा पटेल असं टॅंकर चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अपघात होताच, टॅंकर चालक घटनास्थळावरून फरार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या कोणाचाही जागीच जीव गेला असता. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराला कोणतीही इजा झालेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. टॅंकरच चालक अद्याप फरार आहे. पोलिस टॅंकर चालकाच्या शोधात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2024 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

