Petrol Diesel Price in Maharashtra: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरांनी ओलांडले शतक; कुठे 100 तर काही ठिकाणी 102 रुपये प्रतिलीटर दराने मिळतंय इंधन
Fuel Price Hike India | (File Image)

देशातील पेट्रोल, डिझेल इंधन दरांच्या किंमती ( Petrol-Diesel Price) गगनाला भीडत आहेत. इंधन दरात सातत्याने होणारी वाढ ही सर्वसामान्यांसाठी प्रचंड वेदना देणारी ठरते आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेल दर प्रतिलिटीर अनुक्रमे 24 आणि 25 पैशांनी वाढले आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पद्दुचेरी आणि असम राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देशात इंधन दरांचा भडका उडाला आहे. गेल्या एक महिन्यात जवळपास 13 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. देशातील दरवाढीचा परिणाम सहाजिकच महाराष्ट्रावरही झाला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अर्थशास्त्र कोलमडण्याची वेळ आली आहे. जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरांतील दर (Petrol Diesel Price in Maharashtra). इंधन दरांची सर्व आकडेवारी सर्व आकडेवारी Indian Oil Corporation बेबसाईटवरुन साभार.

राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधन दर

मुंबई

मुंबई शहरात पेट्रोल दरात प्रतिलीट 22 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेल दर प्रतिलीट 27 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 99.75 रुपये आहे तर डिझेल 99.61 रुपये दराने मिळत आहे. मुंबईच्या दरांची राजधानी दिल्लीशी तुलना करायची तर दिल्लीत पेट्रोल, डिझेल अनुक्रमे प्रतिल लिटर 93.44 रुपये आणि 84.32 रुपये दराने विकले जात आहे. (हेही वाचा, Petrol and Diesel Prices in India Today: सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल- डिझेल दरामध्ये वाढ; पहा मुंबई सह मेट्रो सिटी मधील इंधनाचे दर)

नाशिक

नाशिकमध्ये पेट्रोल, डिझेल प्रतिलीटर 100.19 रुपये आणि 90.63 रुपये दराने विकले जात आहे.

परभणी

परभणीमध्ये पेट्रोल, डिझेल प्रतिलीटर 102. 09 रुपये आणि 92.46 दरांनी विकले जात आहे.

पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढतात. परिणामी शेतीमाल, व्यावासायीक वाहतूक, हमाली, विक्री, कर, आणि एकूणच सर्व गोष्टींच्या दराची भरमसाठ वाढ होते. या सर्वांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकाच्या खिशावर पडतो. नागरिकांचे एकूण अर्थकारणच बदलून जाते.