मुंबई: महागाईने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल दरात २.५ रुपयांची कपात केली. दरम्यान, राज्य सरकारनेही जनतेला दिला देण्यासाठी पेट्रोल, डिझेल दरात कपात करावी असे अवाहन केले होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारनेही प्रतिसाद दिला आहे.त्यानुसार राज्य सरकारनेही इंधनावरच्या व्हॅटमध्ये अडीच रूपयांनी कपात केली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल आता चक्क ५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
दरम्यान, सर्वसामान्य जनतेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही प्रमाणात दिलासा दिला. अरुण जेटली यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सरकार अडीच रुपयांची कपात करतअसल्याची घोषणा गुरुवारी (४ ऑक्टोबर) केली. जेटली म्हणाले, सर्वसामान्यांना महागाई आणि पेट्रोल,डिझेलच्या दरांमुळे काहीसा दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. त्यासाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंट ३ भागात विभागले जाईल. एक्साईज ड्यूटी १.५ रुपयांनी कमी करण्यात येईल. ऑईल मार्केटींग कंपनी (ओएमसी) एक रुपया कमी करतील. तर, केंद्र सरकारकडून प्रति लीटर तत्काळ कमी करेन. दरम्यान, जेटली यांनी राज्य सरकारांनाही आवाहन केले आहे की त्यांनीही पेट्रोल, डिझेलच्या दरात काहीशी कपात करावी. जेणेकरुन सर्वसामान्य जनतेला पेट्रोल-डिझेल दरात ५ रुपयांची सूट मिळेल.
पुढे बोलताना जेटली म्हणाले, अमेरिकेने व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे त्याचा बाजारावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. बाजार आणि शेअर मार्केटमध्येही यामुळे चढउतार जाणवत आहे. दरम्यान, महागाई पूर्णपणे नियंत्रात असून, तिचा दर ४ टक्क्यांहून कमी प्रमाणात आहे. गेल्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढत आहे.
Thank you Hon PM @narendramodi ji and Union Minister @arunjaitley ji for reducing ₹2.50/litre on both Diesel and Petrol. This will give huge relief to common citizens.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2018
Maharashtra Government also decided to give additional relief of ₹2.5/litre on Petrol to give total benefit of ₹5/litre in the State of Maharashtra.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2018
We are happy to announce additional relief of ₹2.50 per litre on Petrol which makes ₹5 in all in Maharashtra.
My interaction with media... pic.twitter.com/eB0PIcbsC2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2018
अरुन जेटली यांनी तेल सचिवांसोबत चर्चा झाल्याचेही सांगितले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत सरकार गंभीर आहे. तसेच, या दरवाढीचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे दर नियंत्रित राहतील याकडेही सरकारचे लक्ष असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे. दरम्यान, सूत्रांची माहिती अशी की, बुधवारी संध्याकाळी अरुण जेटली यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली आहे.