साताऱ्यात वरूणराजासोबत बरसले 'साहेब'; सोशल मिडीयावर शरद पवार यांच्या अचाट जिद्दीचे कौतुक, पहा Twitter Reactions
शरद पवार सातारा भाषण (Photo Credit : Facebook)

आजची साताऱ्यामधील शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा प्रचंड गाजली. भर पावसात शरद पवार यांनी सभा घेतली आणि त्याच अवस्थेत लोकही त्यांच्या सभेसाठी उपस्थित होते. महाराष्ट्रातील जनतेने एक अचाट जिद्दीचे ज्वलंत उदाहरण आज पहिले. या निवडणुकीत कोणीही जिंकू, मात्र महाराष्ट्राच्या जनतेची मने शरद पवार यांनी जिंकली आहेत. आकाशातून वरुणराज बरसत होता, स्वतः शरद पावत पूर्ण चिंब झाले होते, सभेसाठी उपस्थित असणारे लोकही भिजले होते. अशा परिस्थितीत 78 वर्षीय शरद पवार यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंवर (Udayan raje Bhosale) तोफ डागली. शरद पवार यांच्या या संयम, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे सोशल मिडीयावर प्रचंड कौतुक होत आहे. 'जेव्हा आयुष्यात सगळं सपलं असं वाटेल ना तेव्हां शरद पवार आठवा आणि लढायला उभे रहा! जिंकलाच म्हणून समजा!' अशा प्रकारची मते लोक व्यक्त करत आहेत. चला पाहूया अशाच काही प्रतिक्रिया.

 

(हेही वाचा: साताऱ्यामध्ये भर पावसात पार पडली शरद पवार यांची सभा; 'लोकसभेसाठी उदयनराजेंना उमेदवारी देऊन केली चूक' (Video)

दरम्यान, वयाच्या 78 व्या वर्षे पक्षाला विजय मिळवून देण्यसाठी स्वतः शरद पवार निवडणुकीच्या प्रचारसभेत उतरले आहेत. आज सकाळी 10 वाजता पंढरपूर आणि त्यानंतर अंबाजोगाईची सभा केल्यानंतर शरद पवार यांची साताऱ्यामध्ये संध्याकाळी सभा पार पडली. लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सातारा इथे सभा घेतली.