शरद पवार सातारा सभा (Photo Crdit : Facebook)

महाराष्ट्र विधानसभेसाठी प्रचारतोफा उद्या थंडावणार आहेत. आज मुंबईमध्ये महायुतीही तर साताऱ्यामध्ये (Satara) राष्ट्रवादीची (NCP) मोठी सभा पार पडली. साताऱ्यामधील सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी जनतेला संबोधित केले. त्यांची ही सभा प्रचंड गाजली. भर पावसात शरद पवार यांनी सभा घेतली आणि त्याच अवस्थेत लोकही त्यांच्या सभेसाठी उपस्थित होते. आकाशातून वरुणराज बरसात होता, स्वतः शरद पावत पूर्ण चिंब झाले होते, सभेसाठी उपस्थित असणारे लोकही भिजले होते. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंवर (Udayan raje Bhosale) तोफ डागली.

सातारा येथील शरद पवारांच्या सभेचा व्हिडीओ -

'सातारा जिल्हा विचारांचा आणि मतांचा पक्का आहे, शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने जपणारा जिल्हा आहे. त्यामुळे मत कोणाला द्यायचे हे त्याला माहित आहे. मुख्यमंत्री सांगतात आम्हाला पैलवान दिसत नाहीत मात्र याच साताऱ्यातील अनेक पैलवान आज आमच्या सोबत आहेत.' असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केलेल्या उदयनराजेंवर हल्ला चढवला. 'लोकसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी देऊन मी मोठी चूक केली. आता हीच चूक मला दुरुस्त करायची आहे' असे उद्गार त्यांनी काढले. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2019: सध्याच्या सरकारवर भ्रष्ट्राचाराचा डाग नाही; मुंबईच्या महायुतीच्या सभेत पीएम नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक)

वयाच्या 78 व्या वर्षे पक्षाला विजय मिळवून देण्यसाठी स्वतः शरद पवार निवडणुकीच्या प्रचारसभेत उतरले आहेत. आज सकाळी 10 वाजता पंढरपूर आणि त्यानंतर अंबाजोगाईची सभा केल्यानंतर शरद पवार यांची साताऱ्यामध्ये संध्याकाळी सभा पार पडली. लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सातारा इथे सभा घेतली.