Laila Khan (PC - X/@HTMumbai)

Laila Khan Murder Case: प्रसिद्ध अभिनेत्री लैला खान (Laila Khan) हत्या (Murder) प्रकरण खूप चर्चेत आहे. आज म्हणजेच 24 मे रोजी या प्रकरणाचा अंतिम निकाल आला असून न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. लैला खान हत्या प्रकरण (Laila Khan Murder Case) खूप चर्चेत आहे. तब्बल 13 वर्षांनंतर मुंबई कोर्टाने अभिनेत्रीला न्याय दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लैला खान खून प्रकरणात न्यायालयाने तिच्या सावत्र वडिलांना लैला, तिची आई आणि चार भावंडांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्याचवेळी आज न्यायालयाने यावर शिक्षा सुनावली आहे. गेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी दोषी परवेझ टाकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हा खून पूर्णपणे नियोजित होता, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.

लैला खान हत्याकांडप्रकरणी मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आरोपीचे वकील वहाब खान यांनी युक्तिवाद केला, ज्यामध्ये त्यांनी किमान जन्मठेपेची मागणी केली. वकिलाने सांगितले की, या प्रकरणात कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही. याशिवाय दोषीच्या वकिलाने टाकच्या तुरुंगातील चांगल्या वागणुकीकडे लक्ष वेधले आणि तो सुधारला असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याची शिक्षा कमी करण्यात यावी, असा युक्तीवाद केला. (हेही वाचा -Pune Porsche Car Accident: 1 तास TV, 2 तास खेळण्याची वेळ; 'असा' असणार पुण्यातील कार अपघातातील अल्पवयीन मुलांचा बालगृहातील दिनक्रम)

परवेज टाक हे लैलाचे सावत्र वडील आहेत. परवेझने लैलाच्या आईसोबत तिसरे लग्न केले आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये लैला खान, तिची आई आणि चार भावंडांची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बंगल्यात हत्या करण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार, मालमत्तेवरून वाद झाल्यानंतर परवेझने प्रथम आपल्या पत्नीला लक्ष्य केले आणि तिची हत्या केली. (वाचा - Pune Porsche Accident Case: बिल्डरने मुलाला दिली 2.5 कोटींची कार, मात्र 1,758 रुपये फी न भरल्याने नोंदणी रखडली (Video))

यानंतर आरोपीने अभिनेत्री लैला आणि तिच्या चार भावंडांचीही निर्घृण हत्या केली. तपासादरम्यान पोलिसांना बंगल्यातून कुजलेले मृतदेहही सापडले होते. आज 24 मे रोजी या प्रकरणातील शिक्षा जाहीर होऊन अभिनेत्रीला न्याय मिळाला आहे.