Pune Porsche Accident Case: पुण्यात शनिवारी झालेल्या पोर्श कार भीषण अपघातात दोन टेक इंजिनीअर्सना प्राण गमवावे लागले आहेत. ही पोर्श कार अनेक महिन्यांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा खुलासा पुणे पोलिसांनी केला होता. आता माहिती मिळत आहे की, कार मालकाने 1,758 रुपये फी न दिल्यामुळे 2.5 कोटी रुपयांच्या पोर्श कारची नोंदणी होऊ शकली नाही. याबाबत आरटीओ अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले, ‘ही गाडी बेंगळुरूमधील एका डीलरकडून दिली गेली होती. या कारसाठी बेंगळुरू सेंट्रल आरटीओकडून तात्पुरती नोंदणी जारी करण्यात आली होती जी, 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध होती. नंतर 18 एप्रिल 2024 रोजी मालकाने कार पुण्यात आरटीओमध्ये नोंदणीसाठी आणली होती. येथे कारची तपासणी केली गेली आणि मंजुरीही देण्यात आली. मात्र याचे विहित शुल्क भरले गेले नाही म्हणून कारसाठी नोंदणी क्रमांक जारी केला गेला नाही. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्समधून सूट देण्यात आली आहे, त्यामुळे या वाहनासाठी नोंदणी शुल्क अवघे रु. 1,758 होते, जे भरले नाही.’ (हेही वाचा: Pune Car Accident Case: पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा अंडरवर्ल्डशी संबंध; संपूर्ण चौकशी करून कारवाईचे Devendra Fadnavis यांचे आश्वासन)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Pune car accident case | RTO Officer Sanjiv Bhor says, "The car was delivered from a dealer in Bengaluru. A temporary registration was issued from Bengaluru Central RTO which was valid from 18 March 2024 to 17 September 2024... The owner brought the car for registration… pic.twitter.com/ZMvZso8XDI
— ANI (@ANI) May 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)