Pune Car Accident Case: पुण्यात दारूच्या नशेत बेदरकारपणे पोर्श गाडी चालवून, दोन जणांची हत्या केल्याप्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. आरोपी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. अहवालानुसार, आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याने आपल्या भावासोबत झालेल्या संपत्तीच्या वादात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती. याबाबत आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. फडणवीस म्हणाले, ‘पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा अंडरवर्ल्डशी काहीही संबंध असला, तरी त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल. प्रत्येक गोष्टीवर कारवाई केली जाईल.’ (हेही वाचा: Pune Porsche Accident: आरोपी अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे Chhota Rajan शी कनेक्शन; भावासोबतच्या वादात घेतली होती गँगस्टरची मदत, खुनाच्या प्रयत्नाचा खटला सुरू)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Pune car accident case accused's family's link with underworld | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, "Whatever connection there is, the complete investigation will be done. Action will be taken on everything..." pic.twitter.com/41QkCjIfHY
— ANI (@ANI) May 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)