नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (Citizenship Amendment Act) विरोधात देशभरातून अंदोलन केली जात आहे. आसाम, मेघालया, पश्चिम बंगाल या राज्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांनीही या कायद्याला विरोध दर्शवत रस्त्यावर उतरले आहे. नागरिकांनी शांततापूर्वक अंदोलन करावे, असे पोलिसांकडून सतत अवाहन करण्यात केले जात आहे. परंतु, परभणीत (Parbhani) अंदोलनाला हिंसक वळण मिळत असल्याचे दिसत आहे. यात परभणीतील अंदोलनकर्त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हेतर, अंदोलनकर्त्यांनी थेट महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांनी पोलिसांनी सहकार्य करावे, असे अवाहन राजकीय नेत्यांकडून वारंवार केले जात आहे.
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मुंबई, नागपूर, उस्मानाबाद, बीड, याच्यासह अनेक शहरात अंदोलन पाहायला मिळाले. परंतु, परभणीतील अंदोलनकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. परभणीत गुरुवारपासून शांततापूर्वक अंदोलन करण्यात आली होती. पंरतु, आज या अंदोलनाला हिंसक वळण मिळत असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अंदोलनकर्त्यांनी घोषणा बाजी करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरुन धावणारा बसगाड्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यामुळे एसटी महामंडाळाच्या 150 हून अधिक बसगाड्यांची सेवा बंद करण्यात आली आहे. एवढेच नव्हेतर, अंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पेटवून दिले आहे. परभणीत तवाणपूर्वक परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांकडून सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी शांततापूर्वक अंदोलन करावी, असे अवाहन उच्च पदावरील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हे देखील वाचा-महायुती जिंकली पण आघाडी सत्तेवर आली- नारायण राणे
कोणत्याही चुकीच्या निर्णयाच्या विरोधात अंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे. परंतु, कायद्याला धक्का लागणार नाही याची नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.