घाटकोपर पूर्व (Ghatkopar East) विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले पराग शहा (Parag Shah) हे सर्वात श्रीमंत उमेदवार (Wealthiest Candidate) ठरले असून, त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 3383.06 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections) साठी राज्यभरातून 8, 000 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. ज्यामध्ये शाह केवळ त्यांच्या भरीव संपत्तीसाठीच नव्हे तर त्यांच्या मालमत्तेच्या उल्लेखनीय वाढीसाठी देखील अव्वल ठरले आहेत. त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 575% वाढ झाली आहे. 2019 मध्ये शाह यांनी 550.62 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
संपत्ती म्हणजे माणसाच्या भावना
दरम्यान, एनडीटीव्ही या खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना पराग शाह यांनी आपल्या वाढलेल्या संपत्तीबद्दल बोलताना सांगितले की, "मी एक प्रामाणिक उमेदवार आहे. माझ्या शत्रूंनीही मी प्रामाणिक नाही असा दावा कधी केला नाही ". संपत्तीविषयीच्या त्यांच्या विचारांचे तपशीलवार वर्णन करताना ते म्हणाले, "माणसाची संपत्ती ही त्याची मालमत्ता नाही तर त्याच्या भावना असतात. अनेक लोकांकडे संपत्ती आहे. परंतु मिळालेल्या संपत्तीचा चांगला वापर करण्याची इच्छा माझ्यात आहे. देवाने आणि माझ्या देशाने मला खूप काही दिले आहे, म्हणून मी परत देण्यावर विश्वास ठेवतो", असे ते म्हणाले. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्याबद्दल भाजपला उमाळा कायम; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची लालसा नाही)
बचत समाजकार्यासाठी खर्च केल्याचा दावा
घाटकोपर पूर्व येथून भाजप उमेदवार असलेले आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाणारे शाह हे मॅन इन्फ्राकंस्ट्रक्शन लिमिटेड (Man Infraconstruction Ltd.) या सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेल्या कंपनीचे अध्यक्ष आहेत, ज्याचे नेतृत्व त्यांनी 25 वर्षांहून अधिक काळ केले आहे. आपल्या व्यावसायिक कारकीर्दीबरोबरच, शाह सातत्याने सामाजिक कार्यात गुंतलेले आहेत, त्यांनी दावा केला आहे की त्यांची 50% पेक्षा जास्त बचत सामाजिक कारणांसाठी जाते. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाच्या चेहरावरून देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवार यांना थेट आव्हान; पहा काय म्हणाले?)
शाह अलीकडेच एका छोट्या आजारानंतर तब्येतीच्या अफवांमुळे चर्चेत आले होते. या अंदाजांना संबोधित करताना, ते हसत हसत म्हणाले, "राजकारणात, जर तुम्हाला खोकला आला तर दुसरी व्यक्ती तुम्हाला क्षयरोग आहे का? असा विचार करू लागते". वय वर्षे 55 असलेले शाह सांगतात की, आपल्या मतदारांची सेवा करण्यावर आणि समाजासाठी योगदान देण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पारदर्शक कारभार असल्याने आपण या निवडणुकी निश्चित विजयी होऊ असा त्यांचा विश्वास आहे. (हेही वाचा, Mahim Vidhan Sabha Constituency: सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्या विरूद्ध विधानसभा लढवण्यावर ठाम; जाहीर केला नामांकन अर्ज भरण्याची वेळ, तारीख)
दरम्यान, केवळ शाहच नव्हे तर इतरही अनेक उमेदवार प्रचंड श्रीमंत आहेत. राजकारणी मंडळींची संपत्ती दिवसेंदिवस वाढतेच कशी असे कुतुहल सामान्य नागरिकांच्या मनात दडलेले असते. एरवी कोणासही अंदाज नसलेली संपत्ती निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून जेव्हा बाहेर येते तेव्हा मात्र, सामान्यांचे डोळे पांढरे होतात.