ओबीसी विरुद्ध मराठा (OBC vs. Maratha) असा वाद लावण्याचे कटकारस्थान सुरु आहे. ते हाणून पाडले पाहीजे. राज्यात सध्या सरकार पडणार असे रोज मुहूर्त दिले जात आहेत. तर सत्ताधारी सांगत आहेत सरकार मजबूत आहे. सरकार पडणार की नाही ते सोडा. जनतेसाठी काय करता ते सांगा, असा सवाल पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उपस्थित केला आहे. भगवान भक्तीगड (Bhagwan Bhakti Gad) येथून दसरा मेळाव्यात (Pankaja Munde Dasara Melava 2021) त्या बोलत होत्या. या वेळी बोलतान पंकजा मुंडे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, वेळ आली तर जीव ओवाळून टाकेन. माझं तरी तुमच्याशीवाय कोण आहे. मला आहे का कोणी असा नेता जो उचलून सिंहासनावर बसवेल. आहे का माझा पीता जीवंत? त्यामुळे मलाही तुमच्याशिवाय कोणी नाही. म्हणूनच मी वेळ आली तर तुमच्यावर जीवही ओवाळून टाकेल, असे अत्यंत भावनिक उद्गार काढत उपस्थितांच्या हृदयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासमोर माझी झोळी कमी पडली. दसरा मेळाव्याची (Dasara Melava 2021) परंपरा तुमच्यामुळेच कायम राहीली आहे. असेही त्या म्हणाल्या.
राज्यात तिन पक्षांचे सरकार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शोभतील अशा योजना जाहीर करतील अशी आपेक्षा आहे. त्या घोषणांची मी वाट पाहात आहे. एकमेकांना खूश करण्याच्या नादात हे तीन्ही पक्ष एकमेकांना सोईच्या भूमिका घेत असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे काम हवे तसे झाले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. (हेही वाचा, Mohan Bhagwat Dussehra Speech 2021: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे विजयादशमी निमित्त बौध्दिक; ओटीटी प्लॅटफॉर्म, रासायनिक शेती, अंमली पदार्थ, बिटकॉईन यांसह विवध विषयांवर भाष्य)
अनेकदा लोक म्हणाले पंकजा मुंडे घरात बसल्या. कोरोना काळात मी दौरा करायला हवा होता का? कोरोनामुळे लोकांना औषधं मिळत नव्हती, लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. त्या काळात मी दौरा करायचा का? असा सवाल उपस्थित करत, पंकजा मुंडे घरात बसणाऱ्यांपैकी नाही. माझ्या मागे भगवान बाबांची मुर्ती आणि गोपीनाथ मुंडे यांची किर्ती आहे. माझा दौरा लिहून घ्या. 12 डिसेंबरला मी ऊसतोड कामगारांसोबत फडात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. कोरोना काळात सरकारने दिलेले पॅकेज पुरेसे नाही. प्रत्येक खात्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. जनतेचे कमा करा आम्ही सरकारचे जाहीर कौतुक करायला तयार आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
तुम्ही इथून लोक विधानसभेत पाटवलं. त्यांनी आपले मंत्रिपदही भाड्याने दिले, असा टोला पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख टाळत धनंजय मुंडे यांना लगावला. पुढे बोलताना माझ्या घराचे दरवाजे जनतेसाठी 24 तास खुले आहेत. सेल्फीसाठी नव्हे तर कामासाठी. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कामे हाती घ्या. आपल्या गावातील मंदिरे, रुग्णालये आणि विद्यालये स्वच्छ असायला पाहिजेत. ही ठिकाणे हिंदु, मुस्लिम, बौद्ध अथवा कोणत्याही जाती धर्माची असली तरी त्यात स्वच्छता ठेवणे आपले काम आहे. कार्यकर्त्यांनी हे काम निष्ठेने करायला हवे, असे अवाहन पंकजा मुंडे यांन केले.