Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

बहुमजली इमातीमधील (Multi-storied Building) फ्लॅटच्या खिडकीतून आई-वडीलांना पाहताना एका चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघर (Palghar News) जिल्ह्यात घडली. चिमूकली आपल्या आईवडीलांसोबत 19 मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहात होती. मुलीला घरात एकटीलाच सोडून तिची आई वडिलांना सोडण्यासाठी बाहेर गेली होती. या वेळी ग्रील नसलेल्या खिडकीतून खाली डोकावून आपल्या आईवडीलांकडे पाहताना चिमूकलीचा तोल गेला आणि ती खाली पडली. ज्यात तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मुलगी घरात झोपली होती. तिला एकटीलाच ठेऊन आई बाहेर निघालेल्या वडिलांना रेल्वेस्टेशनपर्यंत सोडण्यासाठी गेली होती. दरम्यान, मुलगी झोपेतून उठली. घरात आई-वडील नसल्याने मुलगी त्यांना शोधू लागली. शोधत शोधत ती खिडकीजवळ आली. तिने इकडेतिकडे पाहिले आणि खिडकीतून खाली डोकावले. ज्यात तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. दरम्यान, इमारतीतील एका रहिवाशाने तिला खिडकीतून पडताना पाहिले आणि आरडाओरडा केला. स्थानिक रहिवाशांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. विरार पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, चिमूकलीच्या आई-बाबांसाठी ती एकमेव आपत्य होते. चिमूकलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. दाम्पत्याने आपल्या चिमूकलीचे डोळे आणि कार्यरत असलेले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल स्थानिकांकडून आदराने पाहिले जात आहे.

लहान मुलांबाबत पालकांनी अधिक काळजीपूर्व वागायला हवे. लहान मुले निष्पाप असतात. त्यांना जवळचे, लांबचे, चांगले वाईट, असा काहीही फरक समजत नाही. परिणामी त्यांनी केलेल्या कृतीतील धोकेही त्यांच्या लक्षात येत नाहीत. परिणामी त्यांच्यासोबत अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच पालिकांनी मुलांना एकटे सोडताना, खेळणे म्हणून वस्तू खरेदी करताना किंवा त्यांच्या हातात देताना, तसेच, घरातील किंवा व्यवसायाच्या ठिकाणी- कामाच्या ठिकाणी मुलांना सोबत घेताना अधिक काळजी घ्यावी. अनेकदा मुले आकर्षण अथवा अनभिज्ञता किंवा भीतीमुळे काही कृती करतात. ज्या त्यांना अपघाताला समोले जावे लागते, असे लगान मुलांचे डॉक्टर आणि समुपदेशक सांगतात.

उंचावरुन पडून मुलांची अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही विरार परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये कधी मुलांना जीव गमवावा लागला आहे. तर कधी ती गंभीर जखमीही झाली आहेत.