पालघर येथे मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून 4 जण जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून काही ठिकाणी दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर आज पालघर (Palghar) येथे सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे एका घराचे छत कोसळून 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पालघर-माहीम या मार्गावरील एका घराचे छत पहाटे जोररदार कोसळणाऱ्या पावसामुळे खाली पडले.त्यावेळी घरातील सदस्य गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. मात्र त्यावेळी शेजारील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या घरातील सदस्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.(ठाणे: अटकोनेशवर नगरमधील आदर्श चाळीवर दरड कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू , बचावकार्य सुरू)

तर घरातील सदस्यांपैकी निपेश आणि कल्पना यांच्या डोक्याला आणि शरिरावर गंभीर दुखापत झाली आहे. तर जिगर नावाच्या तरुणालासुद्धा जखमी धाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे घरातील छपारांमधून पाणी गळत असल्याने ही दुर्घटना झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.