ठाणे: अटकोनेशवर नगरमधील आदर्श चाळीवर दरड कोसळल्याने  2 जणांचा  मृत्यू , बचावकार्य सुरू
Land Slide (Photo Credits: Twitter/ ANI)

मुंबई, ठाणे परिसरात पावसाच्या काही दमदार सरी कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. आता पावसाचा जोर थोडा मंदावला असला तरीही दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. आज (30 जुलै) च्या पहाटे कळवा भागातील अटकोनेशवर नगरमधील आदर्श चाळीवर डोंगराचा काही भाग कोसळून एकाच कुटूंबातील 2 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस, प्रशासन, अग्निशामन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. सध्या ढिगारा उपसण्याचं आणि बचावकार्य सुरू आहे. Mumbai Rains Update: मुंबई मध्ये अतिवृष्टीची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

ठाण्यातील या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये बीरेंद्र जसवार (40) आणि सनी जसवार (10) यांचा समावेश आहे. तर जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदर्श चाळीजवळील डोंगराचा भाग धोकादायक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तेथील घरं रिकामी करण्याला सुरूवात झाली आहे. तात्काळ चाळीतून 20 कुटुंबांना जवळच असलेल्या ज्ञानगंगा शाळेत राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. Malad Wall Collapse Incident: मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 29; KEM रूग्णालयातील जखमीचा रूग्णालयात मृत्यू

ANI Tweet

मुंबईमध्ये यंदा पावसाळ्यात मालाड येथे संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना झाली होती. त्या पाठोपाठ डोंगरी येथील इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे मुंबईमध्ये अपघातांचं सत्र सुरूच असल्याने धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींमधील कुटुंबांना इमारती खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.