Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

Maharashtra Monsoon Updates:  मुंबईमध्ये सतत दमदार कोसळणारा पाऊस आता थोडा विसावला आहे. मात्र अधूनमधून त्याची हजेरी असल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडत आहे. मुंबई हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज (30 जुलै) मुंबईमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहेत. 26 जुलैच्या रात्री मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर या भागात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काही तब्बल 48 तासांनंतर हळूहळू जनजीवन पूर्वस्थितीत येण्यास सुरूवात झाली आहे. आता आज सकाळपासून पुन्हा मुंबईमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबई नजिक ठाणे येथील कळवा परिसरात पहाटे दरड कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर घरांची धोकादायक स्थिती पाहता 20 कुटुंबीयांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई प्रमाणे महाराष्ट्राच्या इतर भगातही आज पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. असा अंदाज स्कायमेट कडून वर्तवण्यात आलं आहे.

स्कायमेटचा अंदाज

मुंबईमध्ये 23 जुलैच्या रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवस मुंबई, गोवा, कोकण या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मध्य भारतामध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची हजेरी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.