वसई (Vasai) मध्ये Mardes बीच किनारी 40 फूट लांबीचा आणि 30 टन वजनाचा एक व्हेल मासा (Whale) मृत अवस्थेमध्ये आढळला आहे. काल (21 सप्टेंबर) संध्याकाळी वसई पोलिसांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभाग आणि वसई विरार महानगरपालिकेला (Vasai Virar Mahanagarpalika) त्याची माहिती दिली आहे.दरम्यान हा मासा मेलेल्या अवस्थेमध्ये असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. अंदाजानुसार तो ऑग़स्ट महिन्यातच मेला आहे. त्यामुळे इतका अवजड मासा हलवण्याऐवजी आता त्याला समुद्र किनारी पुरूनच त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. नक्की वाचा: Mumbai: व्हेल माशाची 5 कोटींहून अधिक रक्कम असलेल्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक.
एका अधिकार्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'इतका मोठा मासा हलवणं ही कठीण गोष्ट आहे. भटक्या कुत्रांनी माशाचे लचके तोडू नये म्हणून त्याला या ठिकाणीच समुद्रकिनारी पुरण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.' नक्की वाचा: Viral Video: पहा समुद्रात 'व्हेल' मासा चक्क तरुणासोबत खेळतोय ‘कॅच-कॅच’!
पहा व्हिडिओ
The @MahaForest has started burying a whale carcass which found on the shores of Rangaon in Vasai yesterday. https://t.co/samDDtdBsi pic.twitter.com/nPlB8W2SOX
— Akshay Mandavkar🌿 (@akshay_journo) September 22, 2021
दरम्यान वसईच्या किनार्यावर अशाप्रकारे व्हेल मासा येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आजूबाजूच्या भागातून अनेकांनी या ठिकाणी मासा बघण्यासाठी गर्दी केली होती.