Mumbai: व्हेल माशाची 5 कोटींहून अधिक रक्कम असलेल्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Mumbai: मुंबईच्या गुन्हे शाखेकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडे व्हेल माशाची 5 किलोची उलटी सापडली आहे. याची किंमत तब्बल 5.91 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपींना भांडुप येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(भिवंडी मध्ये सामान्य प्रसूतीद्वारे 32 वर्षीय महिलेने दिला 3 मुलांना जन्म; दुर्मिळ घटना)

गुन्हे शाखेला व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केली जात असल्याच माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र छोट्टो आणि योगेश चव्हाण अशी आरोपींची नावे असून त्यांना ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अटक करण्यात आली.(Nandurbar: आजारी बायकोला खांद्यावर घेऊन चालत 22 किमी अंतरावरील रुग्णालयात जात होता पती; पत्नीचा रस्त्यातच मृत्यू)

पोलिसांनी यांच्याकडून 5.91 किलोची उलटी जप्त केली असून त्याची किंमत 5 कोटींहून अधिक आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. व्हेल माशाची उलटी ही परफ्युम तयार करण्यासाठी वापरली जाते. मात्र त्यासाठी कायद्याने प्रतिबंधित आहे.  कारण शुक्राणू व्हेल एक लुप्तप्राय प्रजाती आहे जी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहे.