भिवंडी मध्ये सामान्य प्रसूतीद्वारे 32 वर्षीय महिलेने दिला 3 मुलांना जन्म; दुर्मिळ घटना
Newborn | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

भिवंडी (Bhiwandi) मध्ये एका 32 वर्षीय स्त्रीने नॉर्मल प्रसुतीद्वारा तीळ्यांना (Triplets) जन्म दिला आहे. ही घटना दुर्मिळ आहे. बाळांना जन्म देताना ती महिला गरोदरपणाच्या 35 व्या आठ्वड्यामध्ये होती. या वेळी तिने दोन मुलं आणि एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांचं वजन 1.7kg, 1.8kg आणि 1.9 kg आहे. Dr Humaira Shaikh यांच्या देखरेखीखाली या महिलेने Royal Hospital मध्ये बाळांना जन्म दिला आहे. बाळांची स्थिती उत्तम असून त्यांना श्वसनाचा कोणताही त्रास नाही.

मंगळवार (7 सप्टेंबर) दिवशी पोटात दुखू लागल्याने तिला मध्यरात्री 12.15 ला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहचे पर्यंत तिला प्रसुती कळा सुरू झाल्या होत्या. हिंदुस्तान टाईम्स सोबत बोलताना दिलेल्या माहितीमध्ये डॉ. शेख यांनी महिलेला तपासल्यानंतर सामान्य प्रसुती होऊ शकते अशी परिस्थिती होती. त्यामुळे पहिल्या बाळासाठी हा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या बाळाच्या प्रसुतीनंतर सी सेक्शनची तयारी सज्ज ठेवण्यात आली आहे. मात्र दुसर्‍या बाळाचा देखील सुखरूप जन्म झाला. तिसरं बाळ horizontal position मध्ये होते. पण त्याला देखील हलवण्यासाठी पुरेशी जागा असल्याने त्याचा जन्म देखील सामान्य प्रसुती द्वारा करण्यात डॉक्टरांना यश मिळालं. अंदाजे 8 हजारांमध्ये एखाद्या प्रकरणामध्ये तिळ्यांचा जन्म हा सामान्य प्रसुतीद्वारा होऊ शकतो. नक्की वाचा: 'No Decuplets': 10 मुलांना जन्म दिल्याचा दावा करणारी Gosiame Thamara Sithole गायब; बॉयफ्रेंडने जारी केले निवेदन- 'कोणताही पुरावा नाही'. 

मुंबईचे स्त्रीरोगतज्ञ Dr Jatinder Kaur यांनी दिलेल्या माहितीमध्ये 35 व्या आठवड्यात अशाप्रकारे 3 बाळांचा नॉर्मल प्रसुतीद्वारा जन्म होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे.