तंबाखू मागण्यावरुन दोन मित्रांमध्ये झाली बाचाबाची; रागाच्या भरात चाकूने वार करुन दुस-याची केली निर्घृण हत्या
Image used for represenational purpose (File Photo)

वाईट गोष्टींचे व्यसन कधी कोणाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही. सावंतवाडीमधील (Sawantwadi) आरोंदा येथे तंबाखू मागण्याच्या शुल्लक कारणा वरुन दोन मित्रांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीत रागाच्या भरात येऊन त्यातील एकाने दुस-याच्या छातीवर चाकूने वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वप्नील जोशी असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिलीप मोर्जे यास पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी दिलीप मोर्जे या स्वप्नीलचा चांगला मित्र होता. हे दोघेही एकाच वाड्यात राहत असून मोलमजुरीही करत होती. पोलीस तपासानुसार, ही घटना रात्रीच्या वेळी घडली. स्वप्नील आणि दिलीप हे दोघे एकत्र बसले होते. त्यावेळी तंबाखू मागण्यावरून या दोघांमध्ये वाद सुरु झाला. थोड्या वेळाने या वादाचे रुपांतर बाचाबाचीत झाले आणि मग रागाच्या भरात आरोपी दिलीप मोर्जे याने आपल्या जवळील चाकूने स्वप्नील जोशी वर चाकूने वार करत त्याचा खून केला.

हेही वाचा- सोलापूर: दिवाळीत माहेरी आलेल्या विवाहितेचा एकतर्फी प्रेमातून खून

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो चाकू जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली. ज्यात टपरीचालकाच्या टपरीवर आलेल्या तिघांना उधारीवर सिगारेट देणे नाकारल्याने त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे तीन आरोपी टपरीचालक संतोषच्या टपरीवर आले. त्यांनी संतोषकडून सिगारेट मागितली. मात्र संतोषने त्यांच्याकडे पैसे मागितले असता, त्यांनी उधारीवर सिगारेट देण्यास सांगितले. मात्र त्याने या गोष्टीस नकार दिल्याने या माथेफिरूंनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या संतोषला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला