मुंबई क्राईम ब्रांच कडून 1 वर्षाच्या (Mumbai Crime Branch's unit 1 ) किडनॅप झालेल्या बाळाची सुटका करण्यात आली आहे. पालकांसोबत चर्चगेट मध्ये Eros Theatre बाहेर फूटपाथवर झोपलेली असताना ही मुलगी किडनॅप झाली होती. दरम्यान या चिमुकलीचं अपहरण करणारी महिला राजस्थानच्या जयपूर मध्ये सापडली आहे.
Free Press Journal च्या रिपोर्टनुसार, Crime Branch Unit 1 च्या इन्सपेक्टर रोहिणी पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11सप्टेंबरला मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारी नंतर पोलिस कामाला लागले. त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये एक महिला बाळाला उचलताना दिसली. नंतर ही महिला सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि नंतर वांद्रे टर्मिनस वरून एका ट्रेन मध्ये चढताना दिसली. दरम्यान ती मेल एक्सप्रेसने जयपूरला गेल्याचं दिसलं.
क्राईम ब्रांच युनिट 1 ची टीम इन्सपेक्टर गावडे यांच्यासोबत जयपूर मध्ये पोहचली. तिथे आरोपी महिलेच्या मुसक्या आवळ्यात आल्या. पोलिस 15 दिवस तेथे राहिल्यानंतर तिचा ठावठिकाणा लागला. दरम्यान आरोपी सतत जागा बदलत असल्याने तिला पकडण्याचं आव्हान होते. क्राईम ब्रांचने महिलेला पकडण्यासाठी खास खबरी लावले होते.
दरम्यान महिला आणि बाळ जयपूर मध्ये एका एटीएम सेंटर मध्ये झोपलेले आढळले. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत महिला आणि बाळ दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांनी फोटो पाठवले आणि दोघांची ओळख पटल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. Fake Kidnapping Messages In Mumbai: मुंबई मध्ये मुलांच्या किडनॅपिंगचे फेक मेसेजेस सोशल मीडीयामध्ये वायरल; अफवांपासून सावध राहण्याचे Mumbai Police यांचे आवाहन.
आरोपी महिला प्रीती उर्फ पायल लक्ष्मण सिंग होती. ही 23 वर्षांची युवती होती. लग्न झाले होते मात्र ती पतीपासून वेगळी राहत होती. दरम्यान या मुलीने बाळाचे अपहरण का केले याचा तपास पोलिसांकडोऔन घेतला जात आहे.